कवी मनाचा माणूस
कवी मनाचा माणूस
सुचेना मज काही
शब्दांशी झाली कट्टी
भावनांचे सुत हरवले
विचारांना दिली सुट्टी
आज वहीत डोकं खुपसणे नको
ते लेखणीचे जुल्म नकोत
निवांत बसुनी आज मला
गर्दीच्या असंख्य डोळ्यातील भाव टीपायचे आहेत
नको आज मुद्द्यांचे टाचण
नको खोलातले वाचन
ध्येयहीन होऊन मुसफिरासारखे फिरायचे आहे
नको शब्दांचे यमक जुळविणे
दिलखेचक उपमा देणे
कवितेतला माणूस की माणसातला कवी हा गुंता सोडवायचा आहे
कवी आणि माणूस ह्यांतील संघर्ष सोडवायचा आहे
