STORYMIRROR

Supriya Devkar

Abstract Others

3  

Supriya Devkar

Abstract Others

कुठवर असं चालायचं

कुठवर असं चालायचं

1 min
192

कुठवर अस चालायचं 

शोधत नवी वाट 

प्रयत्नांच धुकं भोवती 

साचलय किती दाट 


नव नव शोधताना 

समोर वाढलेलं पडून राहतं 

असलेल्याच समाधान 

उपभोगायचच राहून जातं 


होतो मग पश्चात्ताप 

सारच निसटून गेल्यावर 

दुःखाचा डोंगर उभा राहतो 

अनुभवायच राहून गेल्यावर 


हातच्या गोष्टी अनुभवताना 

आनंद होतो फार 

जीवन जगण्याच खरेतर 

हेच असाव सार 


अपेक्षांच ओझे वागवून 

नका जगू अपराधीपणे 

मिळालेल्या सुखासोबत 

जगत रहा स्वच्छंदीपणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract