कुठे लावू झाडं
कुठे लावू झाडं
झाड लावा झाड लावा
सांगत आहे सर्व
देशी झाड लावा
करताय आग्रह
आग्रह त्यांचा मोडता येत नाही
पण कुठे लावू झाडं?
नाही माझ्या जवळ जागा
मोठी देशी झाडं लावया
कुणाच्या जागेवर लावले झाडं
तर कोण त्याची करेल देखभाल?
कर्ज घेऊन घर घ्यायचं
इंचा इंचाचा हिशेब लावायचा
गॅलरीत थोडी झाडं लावायची
पाण्याची तहान ताकावर भागवायची!!
पहातोय स्वप्न झाडं लावण्यास
घर घेण्याच!
