कुसुमाग्रज
कुसुमाग्रज
अक्षरबाग फुलवली तुम्ही
काव्याच्या त्या जीवन लहरी
प्रवासी पक्षी सारेच आम्ही
पाथेय चालतो आहे त्यावरी
जाईचा कुंज फुलविला तुम्ही
चाफा सुंगधीत केलात तुम्ही
वादळ वेल ही आहे हो तुमची
महावृक्ष बीजे रुजवली तुम्ही
रचना तुमच्या अशा छंदोमयी
रुजल्या कशा पहा मराठी माती
स्वगत श्रावण असेच करी
मेघदूतही किनारा दाखवी
विशाखा रसयात्रा काव्याची
मारवा, मुक्तायन, माधवी
सांगती सारेच थांब सहेली
हिमरेषा मग समिधा होती
दत्तक विधान लहानपणी
रत्नाकर मासीक कविता छापी
नटसम्राटाला ज्ञानपीठ देती
ताऱ्याची जागा कुसुमाग्रज घेती
