STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Fantasy

3  

AnjalI Butley

Abstract Fantasy

कटिंग चाय

कटिंग चाय

1 min
488

वरूण राजाने

धाडलाय कटिंग चाय 

आमच्यासाठी खास


डोंगर दर्यातुन

वाहत येतोय 

आमच्या गावात


डोंगराच्या पायथ्याशी

तळ्यात साठलाय

कटिंग चाय


गर्दी केलीय गावकर्यांनी

तयार कसा होतोय

पाहण्या कटिंग चायचे तळे


डोंगर माथ्यातुन 

वाहताय दुधाचे झरे

निघताय वाफाच वाफा चहुकडे


डोंगरावरच्या झाडांत मातीत

मिसळल्या जातय दुध छान

आनंदाच्या ऊकळ्यांच्या वाफा दिसताय वर वर 


डोंगरावरून तयार चहा

दगड धोंड्यातुन वाहत वाहत

गाळला जातो छान


गाळलेला चहा बनतो कटिंग चाय

साठवल्या जातो तळ्यात

गावकर्यांसाठीच खास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract