Sanika Yeole

Abstract Thriller

4.0  

Sanika Yeole

Abstract Thriller

कसा..?

कसा..?

1 min
136


त्सुनामीमध्ये उजाडले गाव,

गाव आले पाण्याच्या घेऱ्यात,

घेऱ्यात येता झाली उलाढाल,

उलाढाल झाली साऱ्या आयुष्याची...


आयुष्याची कमाई दिसे पाणीपाणी,

पाणीपाणी जीव कासावीस होऊनी,

होऊनी धीराचे पुन्हा नवीच लढाई,

लढाई जगण्याची एका शून्यातून...


शून्यातून विचारांचे उघडले दार,

दार निसर्गाचे आम्ही रोखलेले,

रोखलेले विळखे आज गळून पडले,

पडले अहंकाराचे पर्व हे जगाचे... 


जगाचे हाल आज विस्तवासमान,

विस्तवासमान तमा उरी पेटलेली,

पेटलेली ना विझली पाण्याच्या भीतीने,

भीतीने काळजाचे ठोके चुकलेले...


चुकलेले क्षणार्धात डोळ्यांच्या सामोरी,

सामोरी मृत्यू घट्ट मिठीत आलेला,

आलेला आता चुकवायचा कसा?,

'कसा?' एवढाच प्रश्न जिव्हारी उठलेला...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract