STORYMIRROR

Sanika Yeole

Classics Fantasy Inspirational

3  

Sanika Yeole

Classics Fantasy Inspirational

आयुष्याचं संगीत

आयुष्याचं संगीत

1 min
201

कुणी छेडते तार मनाची,

कुणी छेडते सतारीची,

कुणाला लळा कृष्णाचा,

कुणाला नुसतीच ओढ बासरीची...


तबल्यावर मारुनी थाप,

देतो शब्दांना वेगळाच ताल,

थिरकत त्या तालावरती,

सहज बदलते कुणाची चाल...


आवाजाच्या साथीने घालती,

साद काळजाला वेडी पाखरे,

लेझीम घेऊन हातांमध्ये,

कुणी संस्कृतीची नीव सावरे...


मृदुंग, ढोलकी दिनरात वाजती,

सुंदर भजनांची कानी हाक,

पैंजणांच्या छुमछुमण्याने मोकळे,

होतात स्वतंत्र भावना लाख...


कवनामध्ये सांगितली कथा,

नाटकामध्ये भरलं जीवनगीत,

प्रेमाने बहरलेली संस्कृती आपली,

जिने आयुष्याचंही केलं संगीत...!

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics