STORYMIRROR

Sanika Yeole

Action Thriller

3  

Sanika Yeole

Action Thriller

इतिहास

इतिहास

1 min
120

नुसती पाने चाळून पुस्तकाची,

इतिहास डोक्यात जात नाही,

युक्त्या, शक्कला, पेच प्रसंग,

अन् अजून असते बरेच काही...


घोड्यावरती स्वार दिसतो एकटा,

कुटुंब, प्रजा तेवढ्या नजरेआड,

जो कुकर्मांची धरेल संगत कधी,

"पाहू नकोस, त्याला मातीत गाड"...


तलवारीच्या पातीला उगा नसते धार,

प्रत्येकवेळी संरक्षणा मिळत नसते ढाल,

उदार, दानी असण्यासोबतच हवी हुशारी,

समोरचा चालत असतो शिकारीची चाल...


अरे..! धावत्या या अश्वालासुद्धा कळते,

खरी प्रामाणिकता त्याच्या पालकांप्रति,

वार करणारे कायम आपलेच असतात,

त्यामुळे समजून घ्यायला हवी नीती...


घरावरती कुणी घातला घाला की,

कळवळून नाही तडतडून उठायचं,

माहीत नसेल तर तोंड बंद ठेवायचं,

ज्ञात असेल तर इतिहासापुढे झुकायचं...!

आपल्या इतिहासाला मानवंदना.. म्हणून झुकायचं...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action