STORYMIRROR

Sanika Yeole

Abstract Inspirational

3  

Sanika Yeole

Abstract Inspirational

डोंबारीचा खेळ

डोंबारीचा खेळ

1 min
187

पोटापाण्यासाठी सारी कसरत,

संस्कृतीच्या निशाण्या खांद्यावरी,

कधी डोंबारीचा खेळ उभा,

कुठे नाचगाणी तालावरी...


बघ्याबघ्याचा तोच तमाशा,

परिस्थितीची थाप पाठी,

होईल मेहनत याच वयात,

नंतर हातात येणारच काठी...


बैसला समाज कडेकडेने,

रिंगण घालून अवतीभवती,

आशेच्या आम्ही बोलतो बोल्या,

बाकी सोडलेले आहे भाग्यावरती...


मिटलं नाही कधी ओठांवरचं,

हसू खळखळतं साधं निरागस,

कसोटी लागली क्षणाक्षणाला,

पाहिले स्वप्नं सदा विराजस....


झाला जरी गोंधळ आयुष्याचा,

आमची कितीही केली थट्टा जगाने,

आम्ही कणाकणात रुजवली कला,

हे सांगतो ताठ मानेने..अभिमानाने...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract