STORYMIRROR

Sanika Yeole

Abstract Drama

3  

Sanika Yeole

Abstract Drama

मी असून-नसून

मी असून-नसून

1 min
147

विचारांची तंद्री लावून मी,

बसलोय कधीचा खुर्चीमध्ये,

डोळ्यांची ना लवते पापणी,

तरी अश्रूंना जागा अध्येमध्ये..


आठवतो एक सूर चुकलेला,

नकोशी बिघडलेली तान कानी,

कुठे मिळतो शब्द गुंफायला,

कुठे शब्दसाठा सगळ्या भावना जाणी...


तरीही नसतो संपणारा पेच,

आयुष्याचा जरी हातभर क्षणांचा,

हातात आरसा घ्या, घड्याळ घ्या,

पण वेग नि चेहरा नकळताच दोलकाचा...


खांद्यावरची शालही निसटत चालली,

जणू सोडत असावी सारे ऋणानुबंध,

मग येतं हसू ओठांवर तिरसट माझ्या,

कारण मलातरी कुठे उरलाय माणसांचा गंध..!


या बहाद्दराने काय बघायचं त्याच्या,

चष्म्याच्या काचेतून काच पुसून पुसून..?

शेवटी जाणतो की....मी सुद्ध्या,

फरक शून्य जगाला मी असून-नसून...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract