STORYMIRROR

Sanika Yeole

Inspirational

3  

Sanika Yeole

Inspirational

अर्थगर्भित चित्र

अर्थगर्भित चित्र

1 min
80

दिवाणखान्याचे शांत वाटणारे दरवाजे,

कुजबुजत होते काहीतरी त्याच्यामागून,

आरसा सुद्धा पाहत होता गंमत त्याची,

त्याच्या समोर बसून तरी लपून छपून....

त्याचं मात्र याकडे लक्ष नाही गेलं,

तो तर त्याच्या दूरच्या प्रवासात होता...

आयुष्य कितीही बेरंग झालं तरी,

रंगांसोबतचा खेळ सोडायचा नसतो..

हे कदाचित कळलं होतं त्याला...

काळोखात सुद्धा हरवून जात असते म्हणे,

आपलीच सावली...

पण त्याने तर तीही शोधून काढली,

या रंगांच्या आणि कुंचल्याच्या साहाय्याने...

पेटीतून सोनं बाहेर पडावं इतक्या लोभी जगात,

त्याने त्याचं सोनं शोधलं आणि...

योग्य त्या कारणीही लावलं..

भिंतीला पाठ टेकवून कागदावरती,

सांडून टाकाव्या मनाच्या भावना...

इतकं सोप्पं नि सहज,

कसं करता येत असेल आयुष्य?..

याला आणि याच्यासारख्यांना..?

सुंदर, लोभस, भुरळ घालणारं,

तितकंच अर्थगर्भित चित्र...!

आनंद देणारं, विचार करायला भाग पाडणारं,

साधारण म्हणावं पण तितकंच खास...!

अगदी त्याच्यासारखं, थोडं तुमच्यासारखं,

हं...! थोडंसं माझ्यासारखंही...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational