माय मराठी
माय मराठी
माय मराठी माझी
महाराष्ट्राची शान
प्राचीन इतिहास
वाढवतो तिचा मान
मधुर रसाळ लवचिक
अशी मराठी भाषा
अमृततुल्य गोडवा
पसरला दाही दीशा
अभिजात भाषेचा
दर्जा तुला मिळाला
साता समुद्रापार
ध्वज तुझा फळकला
अलंकारांनी तु नटली
रस्व दीर्घ अनुस्वार
अल्पविराम पूर्णविराम
मात्रा काना उकार
संतांच्या मुखी वदली
भारुड पोवाडा अभंग
कथा काव्य ओव्या
अशी ही मराठी अथांग
मालवणी अहिराणि
गोंडी रुपे तुझेच
प्रत्येक मराठी माणसाला
अभिमान आहे मातृभाषेचे