होळी : एक प्रेमोत्सव
होळी : एक प्रेमोत्सव
लाली तुझ्या प्रितीची,
माझ्या गालावर रे दिसतेय...
इंद्रधनुचे रंग लावुनी ,
तुझ्याकडे पाहून हसतेय...||1||
मतलबी दुनियेत वावरताना,
मला अनेकांनी होते फसवले ...
आयुष्यात रंग भरलेस माझ्या ,
जेंव्हा मला तु स्वीकारले...||2||
अनेक रूपात न्हावून आली,
जादूई रंगाची होळी....
चल हृदयावर लिहूया आपण,
तुझ्या नी माझ्या मनातील ओळी....||3||
तुझ्या नावाचा रंग भरताना,
साऱ्या जगास आज कळाले..
पाहिले होते स्वप्न जयाचे,
ते आज मला मिळाले....||4||
