संसार सुख (अभंग)
संसार सुख (अभंग)
संसारी सुख कसे शोधावे |
मुखी सदैव हरिनाम वदावे ||
ठेवावे सदा शुद्ध आचारण |
सुखी संसाराचा मार्ग उध्दारण ||
हरी नाम जपावे सदैव मुखी |
कोणी न दिसणार जगी दु:खी ||
जगतदाता असे परमात्मा |
भुखी जीवांचा शांत करावा आत्मा ||
संसार सुख ईश्वराची भक्ती |
जनकल्याणा उपयोगी पडो शक्ती ||
