STORYMIRROR

Suvarna Pandharinath Walke

Action Inspirational

3  

Suvarna Pandharinath Walke

Action Inspirational

हिरवा-निसर्ग ,वाढ आणि जीवन

हिरवा-निसर्ग ,वाढ आणि जीवन

1 min
252

दुनियाचे विविध रंग,

नटूनी राहिले त्या संग,

जीवन माझे रंगात न्हाले,

निसर्गाचे अमृत प्याले...


आपुलकीचा असेल रंग,

होऊ न द्यावे त्यास बेरंग,

सुख-दुःखाचा रंग,

आनंदाने होऊ दंग....


दीनदुबळ्यांच्या अंगी रंग भरावे,

माणुसकी जपूनी माणूस म्हणूनी उरावे,

दीर्घकाळ टिकावे निसर्गाच्या सान्निध्यात,

रंगाचा बेरंग होत आहे आयुष्यात....


संवर्धित करूया नैसर्गिक रंग,

होत आहे पर्यावरणाचा भंग,

माणुसकीचा भरुया नसानसात रंग,

सर्वत्र पसरेल कस्तुरीचा सुगंध,

रंगात न्हाऊनिया होऊ दंग,

सद्संगात सोबतीला टाळ-मृदुंग....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action