STORYMIRROR

Suvarna Pandharinath Walke

Inspirational

3  

Suvarna Pandharinath Walke

Inspirational

रम्य पहाट

रम्य पहाट

1 min
127

सोन सकाळी हिरव्या वेली

लाजत - गाजत फुलते,

पहाटेच्या शितल

हवेसमवेत डुलते ||


रम्य ती पहाट येते,

सर्वांना सामावून घेते ||

मनाला मोहवणारी,

रोमारोमांत चैतन्य फुलवणारी ||


दूर करूनी काळोखाचा पडदा,

जीवनी टाकते प्रकाश समदा ||

रम्य पहाटेच्या वेळी,

निसर्ग खेळतो विविध खेळी ||


बेधुंद होवूनी आनंद लुटतात सारे,

पहाटेचे ते किती मंद, शितल वारे ||

प्रसन्न करते ती रम्य पहाट,

नकारात्मकतेची लावीते वाट ||


निसर्गाची आल्हाददायक ती वाणी,

रम्य पहाटेच्या वेळी पक्षी गाते मंजुळ गाणी ||

सृष्टी मातेचे ते विलोभनीय दर्शन,

वाईट प्रवृत्तीचे होते विसर्जन...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational