STORYMIRROR

Suvarna Pandharinath Walke

Others

2  

Suvarna Pandharinath Walke

Others

साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे

साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे

1 min
143

आण्णाभाऊचे देखिले हाल,

वाचूनी कार्य झालो हवालदिल,

त्यांच्या साहित्याची वेल,

दाही दिशा वाढे भराभर,

आयुष्याच्या वळणावर,

अतोनात केली मरमर,

बालपणी नाव तुकाराम,

तमाशा फडात रात्रंदिवस

गाळीला घाम,

पोट भरण्या जवळ

नसे दाम,

साहित्य सम्राट झाले

आण्णाभाऊ,

जगभर पोवाडा

त्यांचा लागले गाऊ,

परिस्थितीचा न केला बाऊ,

साहित्यसम्राट घडले भाऊ,

शिकूनी फक्त दिड

दिवसाची शाळा,

उच्च प्रतीचा होता

खड्या आवाजाचा गळा,

खडकातूनी झिरपणारा हा झरा,

साहित्यातील आहे अनमोल हिरा,

देह झिजविला सम चंदन,

सुवर्णा करते काव्यमय वंदन...


Rate this content
Log in