STORYMIRROR

Suvarna Pandharinath Walke

Others

3  

Suvarna Pandharinath Walke

Others

अस्वस्थ समाज

अस्वस्थ समाज

1 min
191

आजच्या या आधुनिक जगात,

आजही लोकांचे वास्तव्य अंधारात,

धावणे सुरू मिळविण्यास स्वास्थ,

रसायन युक्त अन्न करतो फस्त,


धन कमविण्या धावपळ,

वैचारिक धन नाही निर्मळ,

जाती - धर्म एकतेचे साधन,

मतभेद वादविवादाचे कारण,


अन्नधान्यास जगभर वाव,

पोशिंद्यास मिळे अत्यल्प भाव,

अहिंसेच्या या पवित्र देशात,

हिंसाचारी अलग ही वेशात,


अंधश्रद्धेची पूजा-आर्चा,

हक्कासाठी काढावा लागतो मोर्चा,

स्वस्थ समाजाची निघते अस्वस्थ वाणी,

करूण भावनेने घ्यावी ध्यानी,


एकमेकांस साह्य करण्याची वृत्ती,

स्वार्थी भावनेची बनली प्रवृत्ती,

गंगा नदीचे निर्मळ होते पाणी,

स्वस्थ समाजाची आज अस्वस्थ कहाणी....


Rate this content
Log in