राखी एक धागा
राखी एक धागा
1 min
438
प्रेमाचा राखी एक धागा,
त्या धाग्याची हृदयात आहे जागा |
नातं एक जगात भारी,
उत्कृष्ट समजते त्यास दुनियादारी
भांडणं करतो जोऱ्याने,
बहिण वागते तोऱ्याने |
रागाने करतात गट्टी फू,
क्षणार्धात करतात लगेच जू |
महिना तो एक सावन,
पवित्र रिश्ता होतो पावन |
एकमेकांना संकटसमयी आहे साथ,
भावाच्या प्रेरणेने बहीण करते मात |
भावा बहिणीचे पवित्र नातं,
पवित्र सण एक रक्षाबंधन ,
सुवर्णा करते बंधूरायास काव्यमय वंदन |