STORYMIRROR

Suvarna Pandharinath Walke

Inspirational

3  

Suvarna Pandharinath Walke

Inspirational

सुविचारांचे महत्त्व

सुविचारांचे महत्त्व

1 min
209

अनेक विचारांची

जेव्हा होती लढाई ,

सुविचार त्यावरी मार्ग काढी ,


हिऱ्यामाणिकाहूनी

बहुमूल्य ते सुविचार,

कधी ना वाटे जीवनास भार,


संकटावरी निर्भीडपणे करी मात,

जेव्हा असेल जीवन

जगण्या सुविचारांची साथ,


जीवनात येता कधी

नैराश्य, अंधार,

सकारात्मक विचारांची

शक्ती करेल संहार,


कुविचारांचे वाढे

जेव्हा साम्राज्य सारे,

फिरूनी येती

तेव्हा सुविचारांची वारे,


शिकूनी खूप शेवटी

विचाराअभावी अज्ञानी,

सकारात्मकतेचा देवूनी

डोस करूनी सोडी सज्ञानी,


अंगी नसेल सुविचार

जीवन ते अधूर,

कारण सुविचारांचे

फळ ते रसाळ मधूर,


विचार एक चैतन्य शक्ती,

सदभावे करावी

सुविचारांची भक्ती,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational