दिवाळी
दिवाळी
आला दिवाळीचा सण,
आनंदून गेले मन |
चेहऱ्यावरी येते न्यारेच स्मित,
वातावरण होते हर्ष उल्हासित |
उत्सवाचा राजा दिवाळी एक सण,
घरभरूनी जाते सौख्य समृद्धीनं |
लक्ष्मीच्या हाती पूजा,
माने नं त्यास दुजा |
मोठ्या मनाने राबत्या घरातील आया,
दूर निघूनी जातो दुर्गुणांचा साया |
सणी या शोभे फटाके, फराळं,
सर्व सणाहूनी मिळे आनंद निराळं |
सण तो म्हणे दिवाळी,
साजरा होई हिवाळी |
सुगंधीत उटणे लावूनी करे अंघोळी,
दारी शोभे सडा-रांगोळी |
प्रकाश तो एक पणतीचा,
नायनाट करतो अंधाराचा |
माहेरवासीन असे ती एक लाजिरी,
ओवाळीते बंधुराया बहिण साजिरी |