Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suvarna Pandharinath Walke

Inspirational

3  

Suvarna Pandharinath Walke

Inspirational

स्वच्छतेचे महत्व

स्वच्छतेचे महत्व

1 min
375


चला करूया स्वच्छता तना-मनाची,

कमी न पडणार आरोग्य धनाची |

ठेवूया आपला परिसर योग्य,

नांदेल तेथे निरोगी आरोग्य ||


करण्या मनाची स्वच्छता हाती घेवूया लेखणी,

परिसर स्वच्छ करण्या हाती शोभते झाडणी |

भारतीय संस्कृतीत असे मनी विश्वास,

स्वच्छता असे तिथे लक्ष्मीचा निवास ||


हिरव्या शालूने नटलेली पृथ्वी दिसे भारी,

अस्वच्छतेची आज पसरे दुर्गंधी सारी |

स्वच्छता जीवनाचा कोनशिला,

त्याचा पाईक आज कोठे गेला ?


स्वच्छतेची मोहीम घेवूया हाती,

नाही होणार आयुष्याची माती |

प्रत्येक कचऱ्याचे करावे वर्गीकरण,

सजीव सृष्टीचे करूया जतन, संवर्धन ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational