एकतेचे गीत
एकतेचे गीत
माणसाच्या वेषामध्ये,
हैवानांची झाली भरती,
विभाजनाला कारण ठरले,
रंग, रूप, धर्म अन् जाती....
सत्तेसाठी घेतले जीव,
तिसरा येऊन भेदून गेला,
किंचित ना उरला आपलेपणा,
ठेच लागली धर्म-एकतेला..
कोणी आलं नाही या जगी,
जातीधर्मांची घेऊन पाटी,
कर्मांवरती निर्भर आहे सारे,
आणि बाकी सगळे पोटासाठी...
भांडत बसलो वेड्यासारखे,
पण आता आम्ही ते राहिलो नाही,
तुम्हीसुद्धा अवाक व्हाल क्षणभर,
अगदी अशीच आहेत आमची कर्मे काही...
सुरुंग जरी लावला असेल मनी,
आम्ही तिथेही प्रेमाची झाडे लावू,
शब्द आहे आमचा या जगाला,
आम्ही नव्याने एकतेचे गीत गाऊ...!
