STORYMIRROR

Prem Gaikwad

Abstract Action Inspirational

3  

Prem Gaikwad

Abstract Action Inspirational

जयजयकार शिवबाचा

जयजयकार शिवबाचा

1 min
168

शिवाजी महाराजांचा करुया जयजयकार

जयजयकार करु भवानी, जिजाऊंचा,

जिजाऊंचा पुत्र खरा शोभला शिवबा

शिवबा संस्थापक हिंदवी स्वराज्याचा


स्वराज्याचा संस्थापक शिवबा शूर

शूर वीर शिवबाचे मावळे फार,

फार शिवबाची शिकवण मोठी

मोठी शिकवण करा सर्व धर्म आदर


आदर शिवबाने केला सर्व धर्मांचा 

धर्माचा सर्वांच्या केला खरा आदर,

आदर शिवबाचा करीती सरदार 

सरदार नी शिवबा सर्वधर्म धुरंधर


धुरंधर, नीतीवंत समतेचा राजा

राजा शिवाजी सम नाही होणार,

होणार नाही जगी दुसरा शिवाजी

शिवाजी महाराजांचा होतो जयजयकार


जयजयकार करती शिवबाचे मावळे

मावळे शिवबाचे स्वामीनीष्ठ फार,

फार केले त्यांनी कल्याण रयतेचे

रयतेचे राजे ते शिवछत्रपती थोर...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract