मी कळी
मी कळी
मी कळी शोधत आहे
जिवनाचे नवे स्वर
जगण्याच्या या शर्यतीत
प्रकाशाच्या उंबरठ्यावर
मी कळी शोधत आहे.....
धडपड करता करता
वाट सापडते नव्याने
अनोळखी भेट मिळता
सुधारे जगने नव्याने
मी कळी शोधत आहे...
दिशा पुढे जाण्याची
आयुष्याचे विसरून ताप
आनंदी जिवन गाण्याची
प्रकाशाच्या उंबरठ्यावर
नतमस्तक होण्याची
मी कळी शोधत आहे......
