जाणता राजा माझा (पोवाडा)
जाणता राजा माझा (पोवाडा)
शिवबाचा झाला जन्म
हा हा हा हा
शिवबाचा झाला जन्म
जिजाऊ त्या झाल्या धन्य
दादोजींचा शूर शिष्य
तलवारबाजीत कुशल
गनिमीकाव्यात झाला तरबेज
शत्रूचा होतसे लई थरकाप हो जी जी रे, जी जी रे
स्वराज्याचा पाया रोवला हो जी जी रे, जी जी रे।।१।।
मावळ्यांना हाताशी घेऊनी
आशीर्वाद भवानीचा घेऊनी
दिलेली तलवार हाती उपसोनी
घेतली शपथ रक्तानी
तहान भूक सारी हरवोनी
गडावर गड आले जिंकुनी हो जी जी रे, जी जी रे
स्वराज्याचा झेंडा फडकविला हो जी जी रे, जी जी रे।।२।।
गरिबांना दिला हो न्याय
आया बहिणींना दिला अभय
धनधान्याची केली सोय
रयतेला मोकळा श्वास
आदिलशाही, कुतुबशाही
मुघलांना केले हैराण हो जी जी रे, जी जी रे
मराठ्यांचा मान वाढविला हो जी जी रे, जी जी रे।।३।।
महापराक्रमी तो शिवबा
समर्थांचा शिष्य शिवबा
जिजाऊंचा लाडका शिवबा
सामर्थ्यवंत शिवबा
यशवंत होता शिवबा
पुण्यवंत होता शिवबा
वरदवंत आमुचा शिवबा
मराठ्यांचा राजाधिराज शिवबा, हो जी जी रे, जी जी रे
जाणता राजा माझा शिवबा हो जी जी रे, जी जी रे।।४।।
शिवाजी महाराज की जय!
जय जगदंब, जगदंब, जगदंब!
जय भवानी, जय शिवाजी!
