अमर शहीद भगत सिंग
अमर शहीद भगत सिंग
क्रांतिकारी तो लढवय्या
देशासाठी प्राण त्यागला
अवघ्या तेविसाव्या वर्षी
अमर हुतात्मा जाहला
विद्यावती किशन सिंग
शूर वीर पोटी आला
भगत सिंग नाव ठेविले
घराण्याच्या दीपकाला
जलियानवाला बाग
हत्याकांड पाहिले त्याने
गुरुद्वारात लोकांना ठार
मारलेले पाहिले ज्याने
गांधीजींनी बंद केली
चळवळ असहकाराची
भ्रमनिरास जाहला त्याचा
बिकट स्थिती ती मनाची
चौदाव्या वर्षी मनावर
आघात अनेक जाहले
क्रांतिकाराचा मार्ग दिसला
त्या विचाराने जणू झपाटले
व्यासंग होता दांडगा
क्रांती साहित्याचा
समाजाची मानसिकता
बदलण्याचा मानस त्याचा
उत्तम वक्ता होता
काळजाला भिडायच
पत्रकारिता ज्वलंत
ठिणगीच पाडायचा
शिवाजी महाराज होते
प्रेरणास्थान जवळचे
रायगडावर ठरवले
देशासाठी लढायचे
गरिबीतून मुक्तता व्हावी
समजाची सर्वांगीण प्रगती
दास्यत्वातून मुक्त व्हावे
त्याने झाली अधोगती
विचारांनी ह्या उठवली क्रांती
हाती उचलले शस्त्र
जनतेला जागृत केले
नुसते वाचू नका शास्त्र
ब्रिटिशांविरुद्ध अनेक
केली कार्ये हिंसात्मक
छोटी सेना उभारली
देशासाठी क्रांतिकारक
भगतसिंग राजगुरू सुखदेव
तिघांची ज्योत मालवली
सौंडर्सच्या हत्येसाठी
फाशीची शिक्षा जाहली
अमर हुतात्मा जाहले
क्रांतीची ज्योत पेटवली
देशासाठी मरण पत्करण्यास
पिढी नवीन उभारली
