जय भीम बोला.........
जय भीम बोला.........
भीम बोला जय भीम बोला सारे मिळून भीम बोला
चैत्यभुमी चैत्यभुमी जाऊ या भीम गीत हे गाऊया प्रणाम करी
तुज जनसागर अथांग जल अन निलअंबर किर्ती तुझी
या दुनियेत तोड ना तुझ्या कर्तुत्वाला या जगात
स्थान नसे ज्यात मानुसकीला जाळलेस तु
त्या मनुस्मृतीला झालास खरा रे मानुस तु
जगण्याचा हकक मिळवलास तू लढलास तू! जिंकला तू!
कोटींचा त्राता झालास तू
भेदभाव मिटवून जातींचा विनाश गुलामिचा केलास तू
अस्पृषय म्हणून तुझ नमविले महार म्हणून तुझ हिनविले
नमला ना तुझा स्वाभिमान रान तु सारे पेटविले
पसरले काटे मार्गावरी जरी तु विचलीत नाही झाला
ध्येय गाठले शिक्षणाने मिळवुनि ज्ञान तु जग जिंकले
वाट सारी होती काळोखाची दिसली ज्योत तुला बुद्ध धममाची
जन्म तुझा हिंदू धर्माचा केलास प्रण हिंदू म्हणून न मरण्याचा
जागे करून दुनियेला बौद्ध धमम दिला बांधवांना
आधार देऊनि घटनेचा कैवारी झालास
दलीतांचा झगडून आम्हासाठी भीमा तु महामानव झाला
भीम बोला जय भीम बोला सारे मिळूनि भीम बोला...
