वाली रयतेचा
वाली रयतेचा
आज जयंती छत्रपती ची
करु जयजयकार शिवबाचा,
झाला नाही अन् होणार नाही
असा वाली रयतेचा..
मॉ जिजाऊंनी शिवरायांना
संस्कार, शिक्षण दिले,
आणीबाणीचा काळ अन्याय
हाल शिवबांनी पाहिले
वाली मिळाला रयतेला
विडा उचलला स्वराज्याचा...
घेऊन मावळे संगतीला
पराक्रम शिवरायांनी दाविला,
मुत्सद्दी,गनिमी काव्याने
पाणी पाजले शत्रूला,
बोटे छाटली शाहिस्त्याची
केला वध अफजल्याचा...
रयत होती फार त्रस्त
केला शत्रूचा बंदोबस्त,
झाला अन्यायाचा अस्त
सुखी, आनंदी, सारे मस्त
सातासमुद्रापार वाजे
किर्ती डंका शिवाजीचा...
बाजीप्रभू, तानाजी, सूर्याजी
स्वामीभक्त मावळे संगतीला,
हिरोजी,मदारी, जीवाने
लावले प्राण पणाला
करतो, वंदन, प्रणाम
मी मावळा शिवबाचा...
जय भवानी, जय शिवराय
चला करूया गर्जना,
आठवू शिवबाचा पराक्रम
वंदू जिजाऊ, शिवबाना
होतो साजरा जगात, जोषात
आज सोहळा हा जयंतीचा...
