Sanika Yeole

Classics Fantasy

4.0  

Sanika Yeole

Classics Fantasy

गज

गज

1 min
204


डौलाने उधळत गज,

चालला सुखनगरी,

दोन स्वारांची जोडी साथीला घेऊन...


काय नटला-थटला,

लाल रेशमी कापडी,

बारीक नक्षीकाठ..सोनजरीचा लावून...


बांधुनिया घंटी गळा,

ताल ठेक्याने धरतो,

अल्लडतेचा ओलावा बाळ राजस भासतो...


दंतसुळे डोकावती दोन्ही,

दोन बाजूने सोंडेच्या,

हुंकारतो असा..जसा गीत स्वतःचे गातो...


शेपटी वाऱ्यावर त्याची,

झुले घेत निघाली हळुवार,

जणू गजाच्या गाण्याला तिच्या नृत्याची जोड..


दोन फेटेदार स्वार मोठे,

उचलती काठी भिरकोनी,

त्यांच्या रंगांच्या चोळीतून माया पाझरत...


प्रवासी असाही-तसाही,

रात्र-दिवसाची कामाई,

चालत्या सांजेला गाव माघारी बोलावतो...



Rate this content
Log in