शोधू कुठे मी
शोधू कुठे मी
शोधू कुठे मी सांगाल का
मिळते कुठे ते हरवलेले हासू
वेदनेला सोसण्याची शक्ती आणि
लपवता येतील का ते आसू
शोधू कुठे मी...
शोधू कुठे मी सांगाल का
बालपणाचे रूसवे फुगवे
निर्मळ मनाची घट्ट मिठी अन
मातीत बरबटलेले पाय नागवे
शोधू कुठे मी...
शोधू कुठे मी सांगाल का
सुर पारंब्या अन विटीदांडू
ऊनातान्हात वेचलेल्या शेंगा
अन गदगगयाचा डाव मांडू
शोधू कुठे मी
शोधू कुठे मी सांगाल का
आजीच्या बटव्यातील दहा पैसे
वान्याच्या दुकानातील घोळका अन
मुठभर लेमन गोळ्यासाठी आ वासे
