STORYMIRROR

prajakta gaonkar

Inspirational

3  

prajakta gaonkar

Inspirational

ती एक स्त्री

ती एक स्त्री

1 min
616

निशब्द ती निश्चित ती

धुक्यात मधील निरपेक्ष वाट ती....

ओंजळ ती सावली ती

तुटलेल्या अवस्थेतील परिपूर्ण ती...


गाय ती वात्सल्य ती

ममतेच्या देवघरातील किर्तीवंत मुर्ती ती....

भान‌‌ ती बेभान ती

समईच्या दिव्याची पवित्र ज्योत ती....


अश्रू ती हास्य ती 

कधी येताच हुंदका पाठिवरील मायेची थाप ती....

राग ती अनुराग ती 

सात सुरांची वेलीवरील सप्तसंगिनी ती....


ध्यास ती आभास ती

खडतर जीवनाच्या प्रवासातील खरीसोबती ती....

ध्यान‌ ती विश्राम ती

दैवाच्या सुंदर कल्पनेतली एक नाविण्यपूर्ण कल्पना ती....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational