मातृत्व
मातृत्व
पाडसाला पाहून हंबरते रे गाय
मायेच्या कुशीत निज येते सुखसवान गाढ
सुर्याचा तेज जणू मुखी
तर कधी शांतशी मखमली वाट...
खवळत्या समुद्ररूपी जीवनाला पाहून ही
शांत झगडते परीस्थितीशी ती एकटीच माय...
मनी रचून चिंतेचे डोंगर ही
पिल्लांना लाडाने कुरवाळते ती माय...
कधी कडक,
तर प्रसंगी गोड मधाळ...!!
आईच्या वात्सल्याची ती रुपे
असती अनेक हजार...
जीव जीवांची विविधता
सवे रुपे अनेक प्रकार
तरी ओढ मातृत्वाची ती रे तु एकच जाण...!!
साधेपणाची उत्कंठा जणू तू देवघरातील वात
रखूमाईची प्रतिरुप या जीवानी
आई असते जन्मभराची ढाल...!!
लावलीते रे गोडी त्या निराशेत हरवलेल्या दिवसात
दैव रूपी कलाकृती ती
कृपावंत निर्मळ जन्मदात महान...
व्याकुळतेने जवळी राही
अशी सावलीरूपी ती प्रेमळ माय...!!
