शब्दांची जादूगिरी
शब्दांची जादूगिरी
गोडीत ओढीत शब्दांच्या भेटीत
नकळत उमलले ते गीत अनामिक
स्वरांच्या दुनियेतील धुंदी अलौकिक
ओठांतील भावाने ते सतरंगी खुलवीत
ना शब्दांच्या मिठीत ना मिठीच्या ओढीत
स्पर्शानी वेडावतो तो फुलांच्या माळेत
हळूवार त्या लाटेत लाटेच्या कुशीत
समुद्र खळखळून हासतो तिरांच्या समवेत
नाजूकश्या कोमलश्या बेधुंद लहरीत
नसला तरी दिसतो हा परतीचा सुगंध
तुझ्यात नी माझ्यात थोड माझ तुझं अस्तित्व
माळ्याच्या रानांत तो गहीवरतो अलगद निसर्ग

