एकादशी
एकादशी
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग
टाळ चिपळ्याच्या घोषात नाचतो पांडुरंग
हरी मुके मना हरी मुके मना
पांडुरंग हरी विठ्ठल वसतो मनामनात
अंतरंगात डोकावून पाहतो भाव भक्तीचा
पांडुरंग दिसतोय सकलजनात
वारकरी पंथ आमुचा ज्ञानेश्वर संत
पांडुरंगाचा शब्द तो दैवाचा आदेश
जय जय विठ्ठल माझे तुम्हीच दैवत
पांडुरंगाच्या चरणी अर्पण नतमस्तक सर्वस्व
विठ्ठल विठ्ठल तोच घनश्याम सुंदर
पांडुरंगाची पंढरी तेच आमुचे माहेरघर
तुळशीमाळ गळ्यात कासे पितांबर
पांडुरंगाच्या दर्शनास येतात वारकरी ते थोर
रुक्मिणी जिथे तिथे ते प्रेम तुझे मनमोहक
पांडुरंगा सोबत रुक्मिणी ती परिपूर्ण
एकादशीस गोळा होती वारकरी चंद्रभागेच्या तीरी
पांडुरंगाची असे बहिण चंद्रभागा जगाच्या आदिअंती
