STORYMIRROR

prajakta gaonkar

Inspirational

3  

prajakta gaonkar

Inspirational

गुरूनाम स्वामी श्याम

गुरूनाम स्वामी श्याम

1 min
1.0K

अस्तित्व स्वामी परमार्थ स्वामी

स्वामी ज्योत हृदयात तेवत राही

नाही लागे मनाला ती ओढ मोहाची

जीवनात गोडी फक्त स्वामी नामाची


विश्वात सर्वरुपाणि भवविजयी भक्तीच राही

तुम्हास पाहता स्वामी सर्वकाही मी विसरून जाई

नामात‌ ओठात‌ तु सदा सर्वकाळी

जगद्गुरु दत्त दिगंबर तुच माझी विठाई


कंठात दाटून भक्तीच ओसंडून वाही

तुझ्याविना त्रैलोक्यात मज‌‌ आसराच नाही

परमार्थ शाश्वत तु महादेव नंदी विराजी

तुम्हीच कृष्णा माझी आई अंबाबाई


निरागस बालपणी तुज‌ आई मी संबोधली

तुमच्या रुपी दिसे मजला विश्वरूपणी आई महाकाली 

साक्षात मोक्षात स्वामी किर्ती गूरुरूपी धावली

गुरूनाम स्वामी त्रिखंडात गाजली



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational