प्रेम
प्रेम
ओढ मनाची कुजबूज काजव्यांची
शब्दांची जुळवाजुळव पण मनातल्या भावनांची
प्रेमाची कविता असेल आयुष्याच्या वाटेवरची
उलगडता उलगडेना हितगुज दोन जीवाची
ओठांवर माझ्या धुंदी तुझ्याच नावाची
डोळ्याना लागे ती आस फक्त तुलाच पाहण्याची
एकाच शब्दाने तुझ्या वाढते ती धकधक हृदयाची
तू नसता ही समोरी तरी असतोस जवळी

