Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

कृतार्थ जीवन

कृतार्थ जीवन

1 min
116


मी तव चरणी लीन जाहले

संकट कसले कधी न यावे

तुझ्या कृपेचा प्रसाद मिळता

जीवन अवघे कृतार्थ व्हावे ... १


मार्ग निवडते भक्तिपुजेचा

नामजपतपी मन रंगावे

मनात माझ्या हर्ष दाटता

जीवन अवघे कृतार्थ व्हावे ... २


तू देवा ज्ञानाचा दाता

दिलेस पुष्कळ हे मज ठावे

तुझ्या कृपेचा ठेवा मिळता

जीवन अवघे कृतार्थ व्हावे ... ३


मी तव भजनी मग्न राहता

सद्विचार मम मनात यावे

पूजा-अर्चा करता करता

जीवन अवघे कृतार्थ व्हावे ... ४


बहुतच उपकार निसर्गाचे

त्यातच स्वतः हरवून जावे

सुंदर आयुष्य जगता जगता

जीवन अवघे कृतार्थ व्हावे... ५


संगीत असे माझे जीवन

ताला सुरात रंगून जावे

राग कोणते मजला ठावे

जीवन अवघे कृतार्थ व्हावे ... ६


लेखन म्हणजे जीव की प्राण

शब्द शोधूनी किती लिहावे

अक्षर अक्षर मनात येता

जीवन अवघे कृतार्थ व्हावे ... ७


आयुष्यात या काय करावे

माणुसकीचे नाते जपावे

शब्द मुखात जपून बोलता

जीवन अवघे कृतार्थ व्हावे ... ८


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational