STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

कृपणता...!

कृपणता...!

1 min
17.3K


जे काही चांगलं घडत

त्याच खुल्या दिलं स्वागत होऊ दे

आपल्याला जमल नाही

ते दुसऱ्यानं केलं याचा आनंद असू दे


कुसळ शोधण्याची सवय

आता तरी नष्ट होऊ दे

मुसळ स्वतःच्या डोळ्यातलं

एकदा तरी स्पष्ट दिसू दे


मिळेल त्यात समाधान

मानण्याची मानसिकता वृद्धिंगत होऊ दे

मला मलाची हाव

कायमची नाहीशी होऊ दे


गाठीला गाठ मारण्याची सवय जाऊ दे

गाठी सोडून मुक्त जीवन जगणे होऊ दे

आपला तो बाळू

दुसऱ्याच ते कार्ट हे बंद होऊ दे

स्नेहाचे ऋणानुबंध वाढीस लागू दे


खुल्या मनाचे स्वागत होऊ दे

नव्या विचारांचे रोपण होऊ दे

नवीन जीवन चांगले फुलू दे

नवा इतिहास उज्वल उन्नत रचू दे


एक एक प्रगतीचे पाऊल

नित्य नियमाने पुढे पडू दे

जुने जळमट जळून जाऊ दे

सौख्य समाधान शांती नांदू दे


देशाचे पुन्हा एकदा भाग्य खुलू दे

भविष्य सुंदर उन्नत्त उज्वल होऊ दे

सत्यमेव जयतेचे मोल कळू दे

साऱ्या विश्वात देशाची कीर्ती होऊ दे


चला झाले गेले सारे विसरून जाऊ दे

कृपण आचार विचारांचे लक्तर गळून पडू दे

एक नवे स्वप्न आनंदी जीवनाचे

सत्यात उतरू दे....!

सर्व सकारात्मकतेला

मनस्वी शुभेच्छा...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational