कृपा असू द्यावी स्वामी
कृपा असू द्यावी स्वामी
मी अज्ञानी, अजाण हतबल पापी
हे उदार स्वामी माऊली द्यावी मज माफी
चुकलो वागण्यात बराच मी स्वामी
हात जोडून प्रार्थना करतो आपली स्वामी
आपलेच मी आहे लेकरू चूक माझी पोटी घ्यावी
सुधारण्या वर्तन माझे स्वामी एक संधी द्यावी
आपलाच आहे मजला सदैव आधार
स्वामी आपल्या सहवासाने जन्म व्हावा साकार
अनेक रूपे आपली मजला ते दिसली
स्वामी आपली मायेची मूर्ती मनी वसली
मी गजानन भक्त आपुला तुम्हास विनवतो
आपल्या चरणी दयेची भीक मागतो
असू द्यावी मजवर आपली कृपादृष्टी
द्यावी मती वर्णन करण्या आपली महती
