कोरोना
कोरोना
विकसित देशांची ही केली दैना
काय म्हणे तर कोरोना कोरोना...
लोकांना समजवायला सारेच सज्ज
चार हात कराया उचलला आम्ही ध्वज
धावणारी पावलं आता चटकन थांबलीत
साऱ्यांचीच कामं चार हात लांबलीत
कामाचा ताण घरात लागलाय जाणवू
घरी बसून सारे लागलेत बाॅसला मनवू
मुलांचे झालेत क्रीडांगणं बंद
कार्टून, चित्रकलेत सारे झालेत धुंद
स्वयंपाकघरात वाढलीये साऱ्यांची वर्दळ
खाण्यापिण्याचे उलगडेना दिवसभर खळं
चालेल थोडासा वाढला घरातला ताण
कोरोनाची करून देवू साऱ्यांना जाण
आहे आपल्याच हातात कोरोनाशी लढणं
निरोगी स्वतःला ठेवून कोरोनाला मागे पाडणं
