कोणाची तू
कोणाची तू
अमक्याच्या तमक्याच्या
मधलीची मधली
तमक्याच्या तमकीची
पोर न्यारी
तिचं माझ पटत नाही
केला आटापिटा मूळ शोधण्याचा
सापडता सापडत नव्हता
खिन्न मनाने वावरतांना
देत होती तीच आधार
झिगारून तीला द्यायचे होते
पण लळा तीने लावला होता
नात्याला नाव दिले होते
मधलीची मधली म्हणून वावरतांना!
