STORYMIRROR

Pratik Kamble

Tragedy Abstract

2  

Pratik Kamble

Tragedy Abstract

कोण आहे माझं

कोण आहे माझं

1 min
14.5K


पोरका झालो मी नात्याला

आईच्या प्रेमाला मुकलो

मायेच्या वाटेवर चालताना

मी तो रस्ताच चुकलो

अश्रुंचा झरा वाहतोय डोळ्यातुन

मन माझे सतत रडतय

जिव्हाळा आईचा मायेने मला 

वेळोवेळी कमी पडतय

बहिणी सुध्दा गेल्यात दुर आता

आठवण त्यांना येत नाही

दुरावली रक्ताची नाती आता 

 नात्याची भेट होत नाही

कोण आहे माझे आता 

मला काहीच कळत नाही

तुटलेली अतुट नाती आता

पुन्हा कधीच मिळत नाही

दुरदुरवर गेलेत सारे आज

जवळ कोणच नाही राहिले

आई तुझ्या आठवणीत गं

तुझ्या चरणी मी फुले वाहिले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy