कळेचना कशी ही जगबुडी?
कळेचना कशी ही जगबुडी?
कळेचना कशी ही जगबुडी?
माणूस माणुसकीला पारखा
हताश, कफल्लक, चिंतातुर
होत्याच नव्हत क्षणार्धात
तू पहाटे पडलेलं स्वप्न की
सुकर जगण्याचा केवळ भास? ...
दिव्यांचा झगमगाट, जीवघेणी शांतता
दूर रुग्णवाहिका बेफाम धावताना
रातकिड्यांची किर्रर्र -किर्रर्र
कुत्र्यांचा बेसूर आवाज
विद्विग्न मन, तुझेच भास
निरर्थक जणू समग्र जीवन
