STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Classics Romance

3  

Vasudeo Gumatkar

Classics Romance

खरचं मला समजून घेना

खरचं मला समजून घेना

1 min
28.4K


खरचं मला समजून घेना

आज अंधारलेल्या

रस्त्यावर चालत आहे

कोठून काढावे मार्ग

आज मला काही कळेना


खरचं मला समजून घेना

आज मी यशाच्या

शिखरावर असायला हवं होतं

आज आलेल्या संकटांना

सामोरे कसे जावे कळेना


खरचं मला समजून घेना

सोबती पुढे गेले

मी एकटाच मागे पडलो

हातात हात माझा

घेणारा कुणी दिसेना


खरचं मला समजून घेना

अपयशाच्या विहीरीत

बुडताना मी दिसतोय

हात हालवावे किती

आज मला समजेना


खरचं मला समजून घेना

बोलणे बंद झाले

जणू वाचाच गेली

आता कसे सावरावे

आज मलाही कळेना

खरचं मला समजून घेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics