Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Classics Others

4  

Sanjay Dhangawhal

Classics Others

गोड गोजीरा श्रावण

गोड गोजीरा श्रावण

1 min
401



*गोड गोजीरा श्रावण आला*

*आला वसुंधरेचा सण*

*श्रावणाच्या सुंदरतेने*

*शहारून गेले मन*


 *सर सर बरसल्या*

 *पाऊस धारा*

*गंधाळली माती*

*आनंदाने घरगंळत आले*

*दवांचे मोती*


*सैरभैर झाली पाखरे*

*मैना गाते मंजूळ गाणी*

*दऱ्याखोऱ्यातून वाहते*

*खळखळाट पाणी*


*पाणाफुलांच्या गळाभेटीने*

*गंध फुलांचा दरवळतो*

*निळ्या निळ्या* *आभाळातून*

*इंद्रधनू डोकावून पहातो*


*उभा डोंगर पांघरून घेतो*

*शालू हिरवा हिरवा*

*सळसळ येऊन मिठीत घेतो*

*गार गुलाबी गारवा*


*गर्दगडद धुक्यातही* 

*झाडेझुडपे लाडवतात*

*खेळ खेळून लता लतिका*

*एकमेकास छेडतात*


*हिरव्या हिरव्या गालीच्यावर*

*श्रावण हळूच अवतरतो*

*फुलवून पिसारा मोर बघा*

*थुई थुई नाचतो*


*रुबाब देखणा श्रावणाचा*

*डोळेभरून पहावा*

*रंगीबेरंगी आसमंत सारा*

*कवेत धरून घ्यावा*


Rate this content
Log in