तुझा पाऊस माझा पाऊस....
तुझा पाऊस माझा पाऊस....
तुझा पाऊस सांजवेळी
खिडक़ीवार रिमझिमणारा
मनाला हुरहुर लावणारा
माझा पाऊस मध्यानराती
खोपटावर कोसळणारा
जीवाला घोर लावणारा
तुझा पाऊस लाडाचा
अलवार कविमनाचा
दुराव्याच्या आसवांतून
गालावर ओघळणारा
माझा पाऊस शापित
काळजात टाहो फोडणारा
वैरयासरखा बेफाम
वाऱ्यावर नेणारा
तुझ्या पावसाची मिठी गुलाबी
माझ्या पावसाची चिम्ब थरथर
तुझ्या पावसाचे सन
तुझ्या पावसाचे गाणे
माझ्या पावसाचे रोग
माझ्या पावसाचे विराने
तूझा माझा पाऊस
एकाच आभाळाचे देणे
कुणाला सुख समृद्दि
कुणा वनवासी जिने
