एक चहा पाठव
एक चहा पाठव
मस्त कडक कर
झकास आटव
मित्रा ऑफिस मध्ये
एक चहा पाठव || 0 ||
काम करुन
थकवा आलाय
कामाचा लोड पण
खूप झालाय
साखर आलं वेलची चा
अर्क साठव
मित्रा ऑफिस मध्ये
एक चहा पाठव || 1 ||
तरतरी येऊन
थकवा उडेल
चहाच्या कपात
आळस बुडेल
डोळ्यावरची येणारी
झोप हटव
मित्रा ऑफिस मध्ये
एक चहा पाठव || 2 ||
