भावंड
भावंड
चार चार भावंड असलेला मधला काळ आमचा आकर्षण आजही वाटते असा महिमा काळाचा
कुटुंबात वयस्कर, मोठे व लहान सगळेच घर भरले असायचे नेहमी माणसांनी सारखेच
कमतरता कधी घरात कशाची पडत नसायची मध्यमवर्गीय कुटुंब असलं तरी पूर्णता असायची
बचत, तरतूद सहज म्हणून केली जायची चांगल्या गोष्टीची सवय भावंडात आपसूक लागायची
शाळा सगळ्या भावंडाची एकच असायची घरात एकसारखी ती परंपरा पाळायची
खरी मजा होती ती पुस्तक वाटून घेण्यात एकच गणवेश धुवून वर्षभर साठवून घेण्यात
पुस्तक मात्र जुनीच मोठ्यांची लहानांना मिळायची आवड मात्र येत्या वर्षाच्या शाळेची नवीन असायची
वाटणे, वाटून घेण्याची सवय लहानपणापासून लागायची आत्मीयता आपसातली आपुलकीत बदलून जायची
