निर्मळ आनंदाची पाठशाळा
निर्मळ आनंदाची पाठशाळा
रंग... आयुष्याच्या अस्तित्वाची जणू ओळख!
बहारदार हिरवा देतो सतत नाविन्याची साद
अन् शुभ्र पांढरा म्हणजे जणू शांतीचा निनाद!
सोनसळी पिवळा स्नेहाचा तर बुंद लाल प्रेमाचा.
नवख्या प्रेमाची नवलाई, सजवतो तिला रंग गुलाबी.
सकारात्मकतेचे हास्य खुलवणारा नारंगी अन्
विशाल नभांगणी राज्य करणारा आकाशी!
बलिदान व त्यागाचे प्रतीक मिरवणारा भगवा,
वाऱ्यावरती फडकत तोच शिकवतो निर्भीडता!
श्रावणात बरसतो घननिळा अन् पंढरीचा राणा विठू सावळा...
रंग आणि त्यांच्या रंगीत किमया...
निर्मळ आनंदाची जणू पाठशाळा...
